चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत वृद्धाची आत्महत्या

 


गारखेडा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या  केली आहे.

आजाराला कंटाळून चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत या वृध्दाने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना शहरातील गारखेडा परिसरातील भारतनगरजवळ असलेल्या साईनगर येथे घडली असल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे. बापुराव विठोबा लिंगसे (80) असे आत्महत्या करणाऱ्या वृध्दाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापुराव हे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. तर बापुराव यांना पाच मुली असून सर्वांचा विवाह झालेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी लिंगसे यांच्या पायाला मार लागला होता. त्यानंतर त्यांनी यासाठी अनेक दवाखान्यात उपचार केले. मात्र उपचार करूनदेखील वेदना कमी होत नसल्याने ते त्रस्त होते. त्यामुळे अखेर होणाऱ्या वेदनांच्या त्रासाला कंटाळून लिंगसे यांनी रात्री सव्वाबारा वाजता चाकूने स्वतःचा गळा चिरला.


Post a Comment

0 Comments