नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी चाललेल्या ज्वेलर्स मालकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केल्याची धक्कादाक घटना नेरळ-कशेळे राज्य मार्गावर घडली आहे.
कर्जत तालुक्यातील मौजे कशेळे येथील ज्वेलर्स हरिश राजपूत यांची नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील पूजा रिसॉर्टजवळ हत्या करण्यात आली आहे. अज्ञात आरोपींनी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने 8 ठिकाणी वार करून खून करून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. याप्रकरणी नेरळ पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी तपास सुरु केला आहे.
0 Comments