कॉन्स्टेबलने बसमध्ये घुसून सगळ्यांसमोर कापला कंटक्टर पत्नीचा गळा

 


गुजरात पोलिसातील एका शिपायाने पत्नीच्या निर्दयीपणे हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्या आली आहे.

घटना छोट्या उदयपूरची आहे. या शिपायाची पत्नी GSRTC च्या बसमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करत होती. शिपाई अमृत रथवा सूरतमध्ये तैनात आहे. तर त्याची पत्नी मंगूबेन छोटा उदयपूरमध्ये नोकरी करते. अमृतला संशय होता की, त्याच्या पत्नीचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे.

यावरून दोघांमध्ये नेहमीच फोनवर भांडण होत होतं. यामुळे शिपाई पतीने पत्नीच्या हत्येचा प्लान केला. नंतर प्लाननुसार, तो 200 किलोमीटर दूर छोटा उदयपूरमध्ये पोहोचला. इथे रस्त्यावर असलेल्या भीखापूर गावात जाऊन तो उभा राहिला. त्याला माहीत होतं की, बस इथूनच जाईल ज्यात त्याची पत्नी असेल.

नंतर जशी ती भीखापूरमध्ये पोहोचली, अमृत त्या बसमध्ये चढला. त्याने पाहिलं की, कंटक्टरच्या सीटवर त्याची पत्नी मंगूबेन बसली आहे. अमृतने अचानक मंगूबेनला पकडलं आणि धारदार हत्याराने तिचा गळा कापला. त्यानंतर त्याचा राग शांत झाला नाही. त्याने हत्याराने तिच्या शरीरावर अनेक वार केले.

हा सगळा प्रकार बघून सगळे प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. तोपर्यंत अमृत बसमध्येच पत्नीच्या मृतदेहाजवळ बसलेला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अमृतला अटक केली. सध्या त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments