देहूच्या इंद्रायणी नदीतून अवैध वाळू उपसा सुरू असताना पावणे चारच्या सुमारास एक डंपर आला. बाकीचे डंपर वाले गाफील राहिले. अन डंपरमधून उतरल्या गीता गायकवाड.
काही कळायच्या आतच कारवाई आणि वाहने जप्त केली. या कारवाईमुळे त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देहूच्या इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार बर्याच दिवसापासून येत होती. त्यामुळे तहसीलदार गीता गायकवाड यांनी अनोखी शक्कल लढवली. पहाटे पावणे चार वाजता डंपर घेऊन तिथे पोहोचल्या. त्यामुळे इतर अवैध वाळू उपसा करणारे गाफील राहिले.
हा फायदा घेऊन गीता गायकवाड यांनी त्यांच्या टीमसह सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन ट्रॅक्टर व दोन जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. कारवाई पूर्ण करून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात हे देण्यात आले. या कारवाईत जिल्हाधिकारी राजेश देशमुख व प्रांताधिकारी संजय असवले यांच्या मार्गदर्शनाखाली गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडल अधिकारी शेखर शिंदे, बाबा साळुंखे, देहूचे तलाठी सूर्यकांत काळे, म्हशीचे तलाठी अतुल गीते आदींनी सहभाग घेतला.
0 Comments