साहिल शेख (वय 23, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) असे अपहार केलेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकूर यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी आरोपी मित्र साहिल याला विश्वासाने वापरण्यासाठी दिली. ती दुचाकी साहिल याने त्याच्या मूळ गावी मलकापूर येथे नेली. ती बुलेट स्वतःची आहे असे सांगून त्याने तिचा अपहार केला. बुलेट दुचाकी शकूर यांना परत न देता साहिल स्वतः वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments