दोन शाळकरी मुलींची तरुणांकडून छेडछाड

 


दोन शाळकरी मुलींची मोटा सायकल वरून आलेल्या तिघांनी छेडछाड केली. तालुक्यातील एका गावात झालेल्या या प्रकाराबद्दल पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून मोटारसायकलवर येणारे तिघेजण मुलींची छेडछाड करून त्रास देत होते. यामुळे मुलींमध्ये भीती भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शनिवारी सकाळी अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर तिघी विद्यार्थिनी शाळेतून घरी पायी चालल्या होत्या. यावेळी तिघे मोटारसायकलवर आले. त्यातील एकाने तू मला आवडतेस, मला तुझा मोबाईल नंबर दे, असे म्हणत विनयभंग केला. दुसर्‍यानेही तोच प्रकार केला. याबाबत करण बाळू मातंग, कानिफ जालिंदर सरोदे (रा.तिसगाव) व एक अनोळखी अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मुलींची छेड काढणार्‍यांची गय केली जाणार नाही. संबंधित गावात साध्या वेशात पोलिसांची गस्त सुरू केली असून मुलींची छेडछाड करणार्‍यांवर कडी नजर असणार आहे. पोलिसच मुलींची छेड काढणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार आहे


Post a Comment

0 Comments