पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर चार दिवसात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या.
यात एकाच मृत्यू झाला आहे. अशातच कोंढव्यात आतेभावाची भांडणं सोडवण्यासठी गेलेल्या दोघांना चार जणांनी कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैनुद्दीन यांचा आतेभाऊ जैद याची इतरांसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी त्याने हे भांडण सोडवण्यासाठी जैनुद्दीन आणि मोसीन यांना फोन करून बोलावून घेतले.
ते दोघे भांडण सोडवण्यासाठी आले असता, टोळक्याने दोघांना लोखंडी कुऱ्हाड व रॉड डोक्यात मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सौद व त्याचे चुलते इम्रान मुजावर यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली
0 Comments