मित्राच्या नावे व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणुक

 


राजेंद्र सुरेश जैन (वय 56, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जैन, संदीप जैन, दीपक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र अनिल जैन यांचा फोटो वापरून फोन करत फोनवर बोलणारी व्यक्ती हे अनिल जैन आहेत असे भासवले. अनिल जैन यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्लीमध्ये तीन लाख रुपयांची तात्काळ गरज आहे. फिर्यादींनी दिल्ली येथे पैशांची व्यवस्था केल्यास त्यांना पुणे येथे कॅश आणून दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादींनी त्यांचा दिल्ली येथील मित्र शक्ती भाई यांच्याकडून आरोपीस पैसे दिले. आरोपींनी दिल्ली येथे पैसे घेतल्यानंतर ठरल्या प्रमाणे फिर्यादीस पुणे येथे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments