ठाण्याहून भिवंडी मार्गे कशेळी गावाच्या हद्दीतून कारमधून जात असताना अज्ञात बाईकस्वाराने सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश कोकाटे वय ३३ गोळीबारात मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्याची हत्या कंत्राटी कामगार पुरविण्याच्या वादातून झाल्याची माहिती रात्री उशिरा समोर आली आहे. तर गोळीबार करणारा गणेश इंदुलकर हा मुख्य आरोपी आहे. मुख्य आरोपी गणेश ही सराईत गुन्हेगार असून तो फरार झाला आहे
मृतक गणेश काल सायंकाळच्या सुमारास ठाण्याहून घरच्या दिशेने कशेळी येथे कारने जात होता. त्याच सुमारास दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या कारचा पाठलाग करत त्याला कशेळी गावाच्या कामिनी जवळ गाठून त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारा नंतर गंभीर अवस्थेत जखमी गणेश कोकाटेला ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र त्याचा काही वेळातच रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
0 Comments