'मला थोडी दारू प्यायला द्या , वडिलांकडे हट्ट करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 


सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या कंटेटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ नेटिझन्सकडून चांगलीच वाहवा मिळवतात. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे

व्हिडिओत एक लहान मुलगा दारू प्यायला मिळावी, म्हणून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार, मनोरंजक पण काहीसा विचार करायला लावणारा आहे. कारण मद्यपान हे शरीरासाठी घातक मानलं जातं. अल्कोहोलमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे लहान किंवा अल्पवयीन मुलांनी अल्कोहोलपासून दूर राहावं, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. या पार्श्वभूमीवर या लहान मुलाच्या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. मद्यपानामुळे गंभीर आजार होऊ शकतात. मद्यपानाचा थेट परिणाम मेंदूसह अन्य अवयवांवर होतो.

यामुळे शारीरिक संतुलनही बिघडतं. या शिवाय अल्कोहोलमुळे किडनीवर परिणाम होतो आणि डायबेटिसचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान न करण्याचा सल्ला देतात. लहान किंवा अल्पवयीन मुलांनी कदापि दारू पिऊ नये, असं सांगितलं जातं.

पण सोशल मीडियावर सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक लहान मुलगा दारू मिळावी, यासाठी रडताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ @Gulzar_sahab या ट्विटर आयडीवरून शेअर केला गेला आहे. 'थोडी दारु प्यायची आहे', असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 20 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 11 हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे.

Post a Comment

0 Comments