उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीपूरमध्ये एका प्रेमी युगुलाने मंदिरात लग्न केल्यामुळे तिथे तोडफोड करण्यात आली.
स्थानिक सरपंचाने दोघांना आधी खोलीत बेदम मारहाण केली आणि नंतर थुंकून ते चाटायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरं तर प्रेमी युगुलासोबतच्या या क्रूरतेचा व्हिडीओही बनवण्यात आला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी सरपंचाला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
दरम्यान, ही संपूर्ण घटना बहारीाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाला बुजुर्ग गावातील आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने मंदिरात जाऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, सरपंच ब्रिजेश याने दोघांनाही खोलीत बंद करून त्यांना मारहाण करून तिथे तोडफोड केली. तसेच शिवीगाळ करताना सरपंचाने प्रियकर-प्रेयसीला मारहाण केली. एवढेच नाही तर सरपंचाने प्रेमी युगुलाला जमिनीवर थुंकून चाटायला लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
0 Comments