पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. यानंतर लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नीने आपल्या पतीची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. आता वैद्यकीय अहवालात ही बाब उघडकीस येताच मृतांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. दरम्यान, अकोला अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राउत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले पातूरचे ठाणेदार हरीश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
0 Comments