दगडाने ठेचून महिलेचा खून.....

 


येथील म्हाडा काॅलनीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आराेपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या पथकाने आवळल्या.

त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील म्हाडा काॅलनीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह वासनगाव शिवारातील एका ढाब्याच्या पाठीमागील माेकळ्या जागेत मंगळवार, २० डिसेंबर राेजी सकाळी आढळून आला. मदन ऊर्फ मनाेज कदम याने महिलेच्या कपाळावर, डाेक्यावर, ताेंडावर दगडाने ठेचून खून केला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, घटनेनंतर आराेपी मदन कदम याने पाेलिसांना गुंगारा देत पलायन केले हाेते. त्याच्या अटकेसाठी लातूर ग्रामीण पाेलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अशी दाेन स्वतंत्र पथके मागावर हाेती.

आराेपी मदन कदम हा औसा ते निलंगा मार्गावरील करजगाव पाटी परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने माेठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली. लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.


Post a Comment

0 Comments