सीमकार्ड अॅक्टीवेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने सदाशिव पेठेत राहणार्याला एकाला तब्बल 4 लाख 90 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना 23 डिसेंबरला घडली असून याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणी श्रीकांत जोशी (वय - 50, रा. सदाशिव पेठ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जोशी यांना 23 डिसेंबरला सायबर चोरट्याने फोन करून तुमच्या मोबाईलमधील सीम अॅक्टीवेट करण्याचे सांगितले. त्यासाठी त्याने जोशी यांना 10 रूपयांचे रिजार्च करण्याचे सांगून बँक खात्याची माहिती शेअर करण्यास भाग पाडले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 90 हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड तपास करत आहे.
0 Comments