3 मुलांची आई असलेली 45 वर्षांची महिला पडली 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात

 


लखनौमध्ये एक अजब घटना घडली आहे. एक 45 वर्षांची महिला 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे. एवढच नाही तर पोलिसांच्या उपस्थितीत लग्न देखील केलं, पोलीस ठाण्यात रंगलेल्या या विवाहसोहळ्या पोलीस कर्मचारीच वऱ्हाडी झाले होते.

सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचं 15 वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तिला दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन मुलं आहेत.

महिला प्रियकराशी लग्न करण्यासाठी अडून बसली होती. तसेच तिने तरुणाविरोधात तक्रार देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजुच्या नातेवाईकांना बोलावलं आणि कुटुंबीयांची परवानगी घेऊन दोघांचं पोलीस ठाण्यातच लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे. हिंदू रिती रिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला. पोलिसांकडून नातेवाईकांसाठी जेवणाची देखील सोय करण्यात आली होती.

चिरंजीवी नाथ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या प्रियकराला एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबीयांनी याला जोरदार विरोध केला. पण पोलीस ठाण्यात आल्यावर नातेवाईकांना समजावण्यात आलं आणि ते तयार झाले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नासाठी परवानगी दिली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं.


Post a Comment

0 Comments