रानावनात भटकणाऱ्या वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे हरण, डुक्कर, झेब्रा, ससा आदी प्राणी शिकार होत असतात. पण कधी कधी या प्राण्यांच्याही शिकारीचा डाव फसतो आणि शिकाऱ्याचीच शिकार होते.
कारण एकीचे बळ या कथेप्रमाणे छोटे मोठे प्राणी मिळून जेव्हा हिंस्र प्राण्यांवर हल्ला करतात. त्यावेळी ते किती आक्रमक असतात याचा अंदाजही लावणं कठीण आहे. असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानडुक्करांची शिकार करायला आलेल्या बिबट्याचीच फजिती झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तीन रानडुक्कर बिबट्याला चावा घेतानाचे थरारक दृष्य कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.
शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या घाटरस्त्यातून जात असताना तीन रानडुक्करांच्या तावडीत सापडतो. एरव्ही बिबट्याला घाबरून पळणारे रानडुक्कर या बिबट्याला मारण्यात मात्र कंबर कसताना या व्हिडीओत दिसत आहेत. घाटरस्त्यात बिबट्याला खाली पाडून त्याच्यावर हल्ला करताना हे रानडुक्कर व्हिडीओत दिसत आहेत. बिबट्याला धारदार दाताने चावा घेतानाही रानडुक्कार व्हिडीओत दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने कार थांबवून प्राण्यांच्या हल्ल्याच्या हा थरार कॅमेरात कैद केला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल, कारण बिबट्यावर रानडुक्करांनी एवढा खतरनाक हल्ला केल्याचं याआधी क्वचितच पाहिलं असेल.
0 Comments