बापरे! चक्क नागासमोर माकड चाळे शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा

 


सापासोबत मस्ती करणं म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखंच आहे. भारतातील विषारी सापांपैकी अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या नागापासून तर सर्वच चार हात लांब राहतात.

माणसंही या सापासोबत माकडचाळे करत नाहीत. पण खुद्द माकडानेच एका भल्या मोठ्या नागासमोर ‘माकड’चाळे केले. एका माळरानात नागासमोर माकड येऊन त्याची शेपटी धरून त्याला ओढू लागतो. पण नागानेही नेहमीप्रमाणे फणा काढून माकडाला चांगलीच अद्दल घडवली. नाग आणि माकडात झालेला खेळ कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एक माकड काळ्या कुट्ट नागासमोर मस्ती करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा माकड नुसते चाळेच करत नाही तर चक्क नागाला शेपटीला धरून ओढण्याचाही प्रयत्न करतो. त्यानंतर चिडलेल्या नागाने फणा काढून माकडाला डसण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नागाच्या हल्ल्यापासून माकड कसाबसा वाचला. नागाने माकडाला फणा मारला, पण फण्याच्या स्पर्श माकडाला झाला नाही. त्यामुळे नागाच्या हल्ल्यात माकड वाचला. नागासमोर खेळ करणाऱ्या माकडाने काही वेळानंतर माघार घेऊन त्याठिकाणाहून धूम ठोकली असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.


Post a Comment

0 Comments