औरंगाबाद शहरात भररस्त्यात एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला किरकोळ वादातून मारहाण केली.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक इसम रिक्षा चालकाला बेदम मारहाण करताना दिसताय. यावेळी रिक्षावाल्याला रस्त्यावर लोळवून दुचाकीस्वार तरुण चोप देत होता. ही बाब लक्षात आल्यानं उपस्थितांनी मध्ये पडून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
पण तरिही दुचाकीस्वार तरुणाने संतापाच्या भरात रिक्षा चालकाला मारहाण करणं काही केल्या थांबवलं नाही. लाथाबुक्क्यांनी हा तरुण रिक्षा चालकावर तुटून पडला होता. अखेर रस्त्यावरील इतर लोकांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. या भांडणात दुचाकीस्वार तरुणाचं शर्टाची बटणं देखील तुटली होती.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुणाची दुचाकी रस्त्यावर पडल्याचंही दिसून आलं आहे. रिक्षाचा दुचाकीला धक्का लागून तरुण दुचाकीवरुन खाली पडला असावा आणि त्यामुळे संतापलेल्या तरुणाने दुचाकी स्वाराला मारहाण करण्यास सुरुवात केली असावी, अशी शंका उपस्थित केली जातेय. या घटनेप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
0 Comments