राकेश कागडा, सचिन कागडा, विनय सौदे हे तिघे संशयित आरोपींची नावे आहे. इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिला, मुलगी व नातेवाईकांसोबत उपनगर परिसरात जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये जात असतांना हे आरोपी दुचाकी वाहनावर आले. त्यांनी पीडितेच्या मुलीकडे बघून अश्लील हावभाव केले. या प्रकाराला विरोध केल्यानंतर या टोळक्याने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्याचबरोबर नातेवाईकांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी गाडीतून कोयता काढत धाक दाखवला. या घटनेनंतर पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.
0 Comments