पठ्ठ्याने लग्नात कहर केला ! वधुवरांनाच स्टेजवरून खाली उतरवलं अन्....

 


आपल्या मित्राचं लग्न म्हणजे इतर मित्रांच्या उत्सवाचा दिवस असतो. मित्राच्या लग्नामध्ये डान्स, पार्टी आणि मजा करण्याची संधी कुणीच सोडत नाही. तर मस्ती करण्याचा चान्सही मित्राच्या लग्नामध्ये घेतला जातो.

अशाच एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मित्र नवरदेव आणि नवरीला खाली उतरवून आपला फोटो काढताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं प्रामुख्याने दिसून येत आहे. तर लग्नामध्ये फोटो सेशन सुरू असताना काही तरूण स्टेजवर जातात आणि नवरदेव नवरीला बाजूला जायला सांगतात. तेवढ्यात मित्रांचा घोळका स्टेजवर चढून खुर्चीवर बसून फोटो काढताना दिसतआहे. नवरदेव नवरी बाजूला उभा राहिल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

दरम्यान, 'नवरीची काहीतरी इज्जत करा' असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ९० हजारांपेक्षा जास्त युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.

Post a Comment

0 Comments