अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी ; साडेचार लाखाचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली

 


अभिनेत्री आणि एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्या घरी मोलकरणीने साडेचार लाख रुपयांच्या मनगटी घड्याळावर डल्ला मारत पोबारा केला आहे.

याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस मोलकरणीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती यांच्या घरात काही दिवसांपूर्वी मंतिषा खातून नामक महिलेची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती. तिने २० ते २६ डिसेंबर दरम्यान त्यांच्या घरी काम केले. त्याच दरम्यान घरात कोणी नसताना तिने घड्याळ लंपास केले. ज्याची किंमत साडेचार लाख रुपये आहे. चोरी करून खातून पसार झाली. ही बाब क्रांती यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ५ जानेवारी रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित मोलकरीण उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजताच पोलिसांचे पथकही अधिक तपासासाठी तिकडे रवाना झाले आहे.


Post a Comment

0 Comments