शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्या कडेला प्रगती हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत काही रक्कम जप्त करुन ज्ञानेश्वर नवनाथ बहिरे या मटका चालकावर गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण लगत हॉटेल प्रगतीच्या पाठीमागे एक इसम मटका चालवीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस नाईक बापू हडागळे, रोहिदास पारखे, विकास पाटील, किशोर शिवणकर यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक व्यक्ती कागदावर आकडे लिहून कल्याण मटका नावाचा मटका खेळवत असल्याचे दिसून आले यावेळी पोलिसांनी मटका खेळवणाऱ्या ज्ञानेश्वर बहिरे या युवकास ताब्यात घेत त्याच्या जवळील दोन हजार चारशे रुपये जप्त केले.
याबाबत पोलीस नाईक रोहिदास दौलत पारखे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर नवनाथ बहिरे (वय ३२) रा. शिक्रापूर चाकण रोड शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.
0 Comments