पुणे : प्रेमाला नकार दिल्यानंतर देखील तरुणीचा सतत ऑफिस व घराच्या परिसरात पाठलाग करून तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, या तरुणीला व तिच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी बालाजी राजेंद्र सरोदे (वय २१, रा. सेवक चाळ) याला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोंबर ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला आहे. बालाजी व तरुणीची ओळख आहे. बालाजीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. त्याने प्रेमाबाबत विचारणा केली होती. पण, तिने स्पष्ट नकार दिला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments