हरियाणातील करनाल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. लोकांनी त्या व्यक्तीला ओलीस ठेवले आणि थर्ड डिग्री टॉर्चर केले. मिळालेल्या माहितीनुसार, करनालमधील घरौंडा येथील बल्होडा गावातील हे प्रकरण आहे
येथे एका व्यक्तीचे त्याच्या नातेवाईकांनी अपहरण करून त्याला थर्ड डिग्री टॉर्चर केल्याची घटना घडली आहे.
गावातील काही लोकांनी 35 वर्षीय हारूनला ओलीस ठेवले आणि त्याचा अमानुष छळ केला. हारूनच्या छळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हारूनच्या गळ्यात चपलांचा हार दिसत असून त्याला बेदम मारहाण केली जात आहे. या व्यक्तीने आपल्या विवाहित मेव्हणीचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
बल्हेडा गावात राहणारा 35 वर्षीय हारून सात मुलांचा बाप असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या विवाहित मेहुणीसह पळून गेला होता. या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी हारूनचे घरौंडा येथून अपहरण केलं. हारूनने सांगितले की, अनेक लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि गळ्यात चपलांचा हार घालून अत्याचार केला. हारून याने न्यायाची मागणी केली आहे.
गावातील व्यक्तीसोबत घडलेल्या या अमानुष घटनेनंतर गावात बैठक झाली. घडलेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, हारूनने आपल्या मेहुणीला पळवून नेलं. या गुन्ह्यासाठी त्याला कायदेशीर शिक्षा व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे.
0 Comments