नवरीने सासरच्या मंडळींसमोर केला किलर डान्स , पुढे नवरदेवाने केलं असं काही ......

 


सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, हटके, विचित्र व्हिडीओ पहायला मिळतात. लग्न आठवणीत राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या लग्नात काही विशेष काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात

 खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी नवरदेव आणि नवरी मुलगी दोन्हीकडची कुटुंब विशेष मेहनत घेतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या व्हिडीओंमध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या समोर आलेल्या लग्नाच्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, नवरी मुलगी नवरदेवाच्या घरी सासरच्या मंडळींसमोर किलर डान्स करत आहे. नवरदेवासमोर नवरीमुलही डान्स करताना दिसत आहे.


काही वेळातच नवरा मुलगाही गाण्याच्या ठेक्यावर नाचायला लागतो. विशेष गोष्ट म्हणजे, नवरदेवाचं कुटुंब नवरी मुलीला नाचण्यास प्रोत्साहन देत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे.
गाण्यामध्ये कोका-कोलाचा शब्द येताच वरानेही कोका-कोलाची बाटली वधूवर ओतण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांना आवडला आणि आता तो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ranjaykumar87 ने इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत 16 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ फिरत असतात. असे मजेशीर व्हिडीओ पहायला नेटकऱ्यांची चांगली पसंती असते. लग्नातील असा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असे व्हिडीओ लवकर इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.

Post a Comment

0 Comments