पुणे : नारळाच्या फांद्या उतरवत असताना फांदीचा स्पर्श उच्चदाब वीज वाहिनीला झाल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटना खेड शिवापूर परिसरात घडली असून मृत तरुण पुणे शहरातील कोथरुड परिसरातील राहणारा आहे. अभिषेक यशवंत टिळक (वय-20 रा. कोथरुड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अभिषेक हा दोन महिन्यांपूर्वी भास्कर जगताप यांच्या टेम्पोवर चालक म्हणून कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे टेम्पोमध्ये नारळाच्या फांद्या औंध येथून घेऊन तो खेड शिवापूर येथे आला होता. खेड शिवापूर येथील जगताप यांच्या मालकीच्या शेतामध्ये नारळाच्या फांद्या खाली करण्यासाठी अभिषेकने इलेक्ट्रिक पोलच्या तारेखाली टेम्पो उभा केला.
अभिषेक नारळाच्या फाद्या खाली करण्यासाठी टेम्पोत चढला. त्यावेळी नारळाची फांदी 22 केव्ही वीजप्रवाह
असलेल्या तारेला लागली आणि त्यात विजेचा धक्का बसून अभिषेकचा मृत्यू झाला.
ही घटना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अभिषेक हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे.
अभिषेकच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments