शाळेतील शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

 


कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामुळे पालक आपली मुलगी शाळेत असताना निर्धास्त असतात.

मुलगी शाळेत सुरक्षित आहे, ही खात्री त्यांना असते. परंतु पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एका इंग्रजी शाळेत जे घडले, त्यामुळे समस्त पालकवर्गांना धक्का बसणार आहे. शाळेतील शिक्षकच आपल्या विद्यार्थीनींना अश्लिल मेसेज पाठवत होते. आता मुलींनी तक्रार केल्यानंतर शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अविनाश गोविंद चिलवेरी (वय २३, येरवडा) हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हा व्यक्ती शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याने आपल्याच शाळेतीलच चार अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवरअश्लिल मेसेज पाठवले. या मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी चिलवेरी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments