सहा गोळ्या झाडून व्यावसायिकाची मध्यरात्री हत्या

 


सातारा : पुणे - बेंगलोर महामार्गावरील वाढे गावाच्या हद्दीत गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले यांच्यावर एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाढे फाट्यावरील एका हॉटेल समोर तीन ते चार तरुण गप्पा मारत उभे राहिले होते. त्यावेळी तिथे अमित भोसले सुद्धा होते. त्यातील एका युवकाने अमित भोसले यांच्यावर अचानक गोळीबार केला. एकूण सहा गोळ्या त्यांच्यावर झाडे झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराने आजूबाजूचे व्यावसायिक ही तेथे धावत आले. मात्र, तोपर्यंत गोळीबार करणारे तरुण तिथून पसार झाले होते. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलीस, सातारा शहर आणि एलसीबी पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा पाऊस फाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला. पोलिसांनी वाढे फाटा परिसर पिंजून काढला. मात्र, संशयित आरोपी सापडले नाहीत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झालं हे मात्र अद्यापही पुढे आले नाही. व्यावसायिक अमित भोसले यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शुभविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी, मित्रांनी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असूनही पथके सातारा शहरासह पुणे, कराड कोल्हापूर येथे रवाना झाली आहे. व्यवसायिक कारणातून किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाला आहे का याची पोलीस माहिती घेत आहे.


Post a Comment

0 Comments