वृध्दाला फरफटत नेणाऱ्या दुचाकीस्वाराचा .....व्हिडिओ व्हायरल

 


सोशल मीडियावर  सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल  होत आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. दुचाकीस्वार एका वृद्धाला फरफटत नेत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा थरार कैद केला आहे. कर्नाटकमधील  ही घटना असल्याची माहिती मिळतेय. टाटा सूमो आणि दुचाकीस्वाराची टक्कर झाली. त्यानतंर या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद हाणमारीपर्यंत आल्यावर दुचाकीस्वार तिथून पळाला, पण टाटा सूमो चालकाने दुचाकी मागून पकडण्याचा प्रयत्न केला.

दुचाकीस्वाराने त्याच अवस्थेत त्याला फरफटत नेलं. बऱ्याच अंतरापर्यंत दुचाकीस्वाराने या वृद्धाला फरफटत नेल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने रिक्षा आडवी घालत दुचाकीस्वाराला अडवलं.


Post a Comment

0 Comments