नेपाळचे विमान कोसळून ६८ ठार

 


पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६८ जणांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे पोखरा विमानतळाचे १५ दिवसांपूर्वीच १ जानेवारीला उद्घाटन झाले होते.

यती एअरलाइन्सच्या एएन-एएनसी एटीआर ७२ विमानाने सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. अकराच्या सुमारास पोखरा विमानतळावर उतरत असताना जुन्या व नवीन विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले. १० परदेशी प्रवाशांसह विमानात ६८ प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते. रात्री उशिरापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्याखालून ६८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

> लॅडिंगसाठी विमानतळाच्या दिशेने येत असलेले विमान काही सेकंद आधी अचानक एका बाजूला झुकल्यासारखे दिसते. हे नेमके कशामुळे घडले याचा तपास सुरु आहे.

> कोसळण्यापूर्वी विमान एका बाजूला आणखी झुकले आहे. यावेळीच विमानात आगही लागल्याची शक्यता आहे.

> क्षणार्धात विमान एका बाजूला आणखी झुकले. ते जवळच्या टेकडीला धडकले असावे, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले.

पाचही भारतीय उत्तर प्रदेशचे आहेत. सोनू जैस्वाल, अभिषेक कुशवाह, अनिल कुमार राजभर आणि बिशाल शर्मा या चौघांच्या मृत्यूची पुष्टी झाली. पाचव्या व्यक्तीचे नाव संजय जयस्वाल असे आहे.

- नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते.

- जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.

- अपघातस्थळी गर्दी जमल्याने रविवारी बचाव कार्यात अडथळे आले.


Post a Comment

0 Comments