दोघे मोबाईल चोरटे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त

 


दुचाकीवर यायचे आणि पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून धूम ठोकायची, अशा धाटणीच्या मालेगाव येथील संशयित दोघा चोरट्यांना चोवीस तासांत चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

चोरट्यांकडून मोबाईलसह सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

येथील अन्सारी नगरातील मोहम्मद मुस्तफा अन्सारी हा तरुण ८ जानेवारीला रात्री साडेअकराला तिरंगा चौक ते लोकमान्य हॉस्पिटल यादरम्यान मोबाईलवर बोलत पायी जात होता. त्या वेळी सागर हॉटेलजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी अन्सारी याचा मोबाईल हिसकावून पलायन केले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल झाला.

Post a Comment

0 Comments