तीन मित्रांच्या वादात ,एकाला संपवलं... फेसबुक कमेंट पडली महागात

 


नाशिक शहरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अंबड परिसरात किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा राग अनावर झाल्याने पित्याने मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच सातपूर परिसरात फेसबुक वादातून दोघा मित्रांनीच तिसऱ्या मित्राला संपवल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. सलग दोन दिवसात दोन खुनाच्या घटनांनी शहर हादरले आहे. सातपूर  गावातील गोरक्षनाथ रोड मळे परिसरातील काश्मीर व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांमध्ये काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास फेसबुक पोस्टवरून वाद झाला. या कारणातून संतोष जयस्वाल या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयितानी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. संतोष जयस्वाल असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो गॅरेजमध्ये काम करीत होता. मयत संतोष राहत असलेल्या सोनवणे चाळीतील मुन्ना निषाद, नरसिंग निषाद आणि मयत संतोष जयस्वाल यांच्यात फेसबुक पोस्ट वरून वाद झाला. त्या कारणावरून संतोष यास लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

संतोष हा सातपूरच्या काश्मिरे मळ्यात आपल्या भावासह राहत असून याच परिसरातील गॅरेज मेकॅनिकचे काम करतो. संतोषचा मित्र लखन याने केलेल्या फेसबुक पोस्टला संतोष नेहमी कमेंट करत असल्यामुळे त्याच परिसरात राहणारे संशयित मुन्ना निषाद व रामकृष्ण निषाद यांच्यात खटके उडत होते. याच वादातून मुन्ना निषाद, नरसिंग निषाद व संतोष यांचे मंगळवारी मध्यरात्री भांडण झाले. या वादातून संतोषला जबर मारहाण करण्यात आली. संतोष यास जखमी अवस्थेत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. ही बाब संतोष याच्या नातेवाईकांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी झालेल्या संतोष जयस्वाल गंभीर जखमी झाल्याने त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सर्व पथक घटनास्थळी पोहचले. मात्र मारहाण करणारा संशयित मुन्ना निषाद आणि नरसिंग निषाद फरार झाले असल्याचे समजते आहे. पोलीस प्रशासन संशयितांचा शोध घेत आहेत

संतोषचा मित्र लखन याने केलेल्या फेसबुक पोस्टला संतोष नेहमी कमेंट करत असल्यामुळे त्याच परिसरात राहणारे संशयित आरोपी मुन्ना निषाद व रामकृष्ण निषाद यांच्यात खटके उडत होते. मात्र याच वादातून संतोषचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुदगल यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचून तपासणी केली. दरम्यान संशयित इसम फरार असून त्याच्या मागावर पोलिसांनी विशेष पथक रवाना केले आहे.


Post a Comment

0 Comments