तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात राहणारे संग्राम घुमे हे २० जानेवारी रोजी नातेवाईकांकडे गेलेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्याच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे शेजारील नागरिकांना दिसले त्यांनी याबाबत घुमे यांना माहिती देताच त्यांनी घरी येत पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे तसेच कपाट उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे पाहणी केली असता कपाटातील 30 तोळे सोन्याचे दागिने, देवाची चांदीची मूर्ती तसेच 30 हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत संग्राम सुदाम घुमे (वय ४०) रा. शिक्षक भवन कॉलनी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करत आहे.
0 Comments