गोडवाडी (उंब्रज) ता. कराड येथील मोट नावाच्या शिवारात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी गुरुवार दि. 19 रोजी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी दोन लाख 65 हजारांच्या मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरंग मारुती थोरात, मिथुन गणपत दुटाळ, विठ्ठल दत्तात्रय सुळे, किरण पांडुरंग पवार, वसंत मारुती लोहार, विश्वनाथ तुकाराम यादव व रामचंद्र नथुराम संकपाळ सर्व रा. अंधारवाडी ता. कराड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गोडवाडीच्या शिवारात तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश बनकर, श्रीधर माने, निलेश पवार यांच्या पथकाने मोट नावच्या शिवारात झाडाच्या आडोश्याला सुरु असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी तीन पानी जुगार खेळताना सातजण रंगेहाथ मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून पोलिसांनी संशयितांकडून 2 लाख 65 हजार 730 रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments