कामावरून परत येणाऱ्या प्रवासी महिलेचा चालत्या एसटीत वाहकानेच विनयभंग केल्याची घटना घडल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका नामाकित कंपनीत कंन्सल्टंट असणाऱ्या पेणमधील 30 वर्षांची महिला कंपनीच्या कामानिमित्त बुधवारी सायंकाळी पनवेल - रोहा एस टीने पनवेल ते पेण प्रवास करीत होती.
महिला वाहकाच्या बाजूला बसल्याचा गैरफायदा घेत एसटी वाहक एस.बी.शिंदे (रोहा डेपो) यांनी अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग केला. याबबात पेण पोलीस ठाण्यात महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वाहकावर एसटी प्रशासनाने कारवाई करत त्याला निलंबित केले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिली. एसटी वाहक एस.बी. शिंदे याला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात येत आहे.
0 Comments