मुंबईतील मालवणी पोलिसांनी दुसऱ्यांदा बनावट नोटांसह दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 19 लाख रुपयांच्या वेगवेगळ्या नोटा जप्त केल्या.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता आरोपी फहिल इरफान शेख याच्याकडून एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मालवणी पोलिसांनी दुसरा आरोपी मेहबूब नबीसाब शेख याला पालघर येथून अटक केली. घराची झडती घेतली असता १८ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
0 Comments