पुणे: फुटबाॅल खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा भागात घडली. अल्पवयीन मुलांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. मुलांनी दोन रिक्षांच्या काचा फोडल्या.या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अब्दुल अमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले आणि खान एकाच भागात राहायला आहेत. फुटबाॅल खेळताना अल्पवयीन मुले आणि खान यांच्यात वाद झाला होता.
खान, त्याचे मित्र, महेश मिश्रा, आयुष दुचाकीवरुन येरवडा भागातून निघाले होते.त्या वेळी अल्पवयीन मुलांनी दुचाकीस्वार खानला अडवले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. पसार झालेल्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
0 Comments