मम्मे मला शाळा नको, मी म्हशी राखते , चिमुकलीची विनवणी

 


लहान मुले खूप निरागस असतात. त्यांना एखादी गोष्ट आवडली की ते ती गोष्ट मिळवण्यासाठी खूप रडतात तर एखादी गोष्ट आवडत नसेल तरीही रडतात. आपण लहानपणी शाळेत जाणं टाळण्यासाठी अनेक नाटकं केले असतील किंवा तऱ्हातऱ्हाचे कारणे सांगितले असतील पण एका चिमुकलीने आपल्या आईला सांगितलेलं कारण ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सध्या एका चार ते पाच वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती शाळेत जायला कंटाळली असून आपल्या आईला शाळेत न जाण्यासाठी सांगत आहे. मी म्हशी राखते पण शाळेत जाणार नाही अशी विनवणी ती आपल्या आईकडे करत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, आराध्या कावठे असा आयडी असलेल्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर या गोड चिमुकलीची विनवणी ऐकून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. तर त्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments