किरकोळ वादातून गेला जीव

 


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथे एका शेतकर्‍याला सहा जणांच्या टोळक्याने गाय शेतात का चारली, या किरकोळ कारणावरुन लाठ्या, काठ्या, कुर्‍हाडीने घाव घालत निर्घृण हत्या केली.

घटना बुधवारी( 4 जानेवारी) घडली असून याप्रकरणी सहा जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालन्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथील शेतकरी रामा पिराजी घुले (48) यांचे शेतालगत अशोक रामा सावंत यांचे शेत आहे. बुधवारी दुपारी रामा घुले यांची गाय ही अशोक सावंत यांच्या शेतात गेली असता या कारणावरून बुधवारी रात्री 11 वाजता आमच्या शेतात गाय का चारली, या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादामध्ये अशोक सावंत यांच्यासह सहा जणांच्या गटाने काठ्या, कुर्‍हाडीनी रामा घुले यांच्यावर हल्ला केला. त्यात रामा घुले यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस अंमलदार मदन गायकवाड, संदिप कुटे, नागरगोजे यांच्यासह घटनास्थळी जाऊन सहा संशयितांना ताब्यात घेतले. मृत रामा घुले याचा मुलगा अभिषेक रामा घुले याच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात अशोक रामा सावंत, लहू रामा सावंत,दत्ता लहू सावंत, रामेश्वर अशोक सावंत, शंकर लक्ष्मण धुमक व भगवान लक्ष्मण धुमक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रामा घुले यांचा मृतदेह अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


Post a Comment

0 Comments