जालना : जालन्यात उसाच्या फडा शेजारील खोपीत नवरा एका २१ वर्षीय महिलेवर अत्याचार करत होता.
जालना शहरातील २१ वर्षीय विवाहित महिला घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण खु. या गावात ऊस तोडणीसाठी ऊस तोड कामगार म्हणून गेली होती. ऊस तोडणी ज्या ठिकाणी सुरू होती. त्याचं उसाच्या थळाजवळ एका खोपीत राम भगवान जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा राम जाधव हे राहत होते.
ऊस तोडणी सुरू असताना पीडित महिला आणि वर्षा जधाव यांची ओळख झाल्याने शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वर्षा जाधव हिने त्या ठिकाणी कुणी नसताना पीडित २१ वर्षीय महिलेस आपल्या खोपित पाठवले आणि बाहेरून दार बंद करत दारावर पहारा देत उभी राहिली
दरम्यान खोपित असलेल्या तिच्या पतीने सदर महिलेसोबत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याचा तक्रार या विवाहितेने अंबड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली. तर बलात्कार झालेली घटना ही आष्टी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने अंबड पोलिसांनी हा गुन्हा आष्टी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अधिक तपास आष्टी पोलीस करत आहे.
0 Comments