सावकारी कर्जाच्या जाचामुळे , शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका

 


जिल्ह्यातील भोर  तालुक्यात सावकारी कर्जाच्या जाचामुळे शेतकऱ्याने आत्महत्या  केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये  दाखल झाली आहे.

सतीश बाजीराव शिळीमकर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. सावकारी कर्जाच्या जाचामुळे आत्महत्या केली असल्यामुळे शेतकरी वर्गात घबराहटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पैसे देऊनही सावकार कर्जापोटी 28 लाख रुपये आणि जमीन नावावर करून देण्याची मागणी करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. सतीश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कारण लिहिलं आहे.

सावकारी कर्जाच्या जाचामुळे सतीश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्या केल्याची चिठ्ठी सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील असून राजगड पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सतीश शिळीमकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

सतीश बाजीराव शिळीमकर यांनी गावातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह खाली उतरण्यात आला. त्यावेळी सतीश बाजीराव शिळीमकर यांच्या पॅंटच्या खिशात चिठ्ठी सापडली. अमृत शिळीमकर यांचे पैसे देऊनही ते कर्जापोटी 28 लाख रुपयांची मागणी करीत आहे. त्याचबरोबर जमीन नावावर करुन देण्याची धमकी देत आहे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीन चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments