याप्रकरणी अनिकेत विलास पावळकर (वय 39, रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कापाट उचकटून त्यातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments