पुणे : हडपसर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, केवळ अर्ध्या तासात २ पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ व पावणे दहाच्या सुमारास घडल्या आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील २ अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर भागात घरफोड्या, लुटमार तसेच मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहिला मिळत आहे. या घटनांना पोलिसांना रोखण्यात अपयश येत असून, यासोबतच हाणामारी तसेच दोन गटातील वाद देखील दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या कॅनोल रस्त्याने रात्री सव्वा नऊच्या सुमारास पायी चालत जात होत्या. यावेळी पाठिमागून आलेल्या चोरट्यांच्या त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर अर्ध्यातासातच डीपी रस्त्यावरून पायी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५५ हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. महिलांना आरडाओरडा केला. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments