ऑनलाईन सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीत नोकरी लावतो असे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ खान, रवी आणि रियाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे, असं सांगून ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे सांगत बोलावले
मग त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले. या सगळ्या बाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी यातील दुसरा आरोपी रवीने त्या महिलेला दिली.
महिलेला धमकी देत तिच्याकडून 1 लाख रुपयाची खंडणीही मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीने महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
0 Comments