टीप्पर - ट्रॅक्टरचा अपघात, चालक ठार

 


पाठीमागून येणाऱ्या खडीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर चालक खाली कोसळला. त्याच्या अंगावर खडी पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

संतोष महावीर हुडेद (वय २३, रा. विजयनगर हलगा) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना खमकारट्टी गावाजवळील नाल्यावरील ब्रिजवर आज (दि.२५) सकाळी ७ च्या सुमारास घडली.

संतोष हुडेद याच्या पश्चात आजोबा, आईवडील, बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.


Post a Comment

0 Comments