महिंद्रा कंपनीच्या आवारात आढळला बिबटया


बिबट्या वेअर हाऊसमध्ये आल्याचे लक्षात येताच एच आर मॅनेजर विजय पवार यांनी सीसीटीव्ही फूटेज च्या माध्यमातून व्हीडीओ क्लीप काढून सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर यांना पाठवून नागरीकांना याबाबत माहिती दिली. लागलीच घटनास्थळी  सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर व ग्रामस्थ हजर झाले.

या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेता सरपंच विजय सातकर यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वन विभाग अधिका-यांना कळविल्याचे सांगितले.

बिबट्या दिसून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना दक्ष व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याच्या विभागामार्फत उपाय योजना करण्यात येत आहे. अशी माहिती कान्हे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजय सातकर  यांनी दिली.

Post a Comment

0 Comments