पत्नीसोबत झालेल्या वादातून दारुच्या नशेत पत्नीला व्हिडिओ कॉल करुन पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील जनपद एटा येथे घडली आहे.
पत्नी व्हिडिओ कॉलवर पतीला अडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पतीने ऐकले नाही. या घटनेमुळे पत्नीला धक्का बसला आहे. पत्नीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. श्यामसुंदर असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या घटनेमुळे श्यामसुंदरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Comments