वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. चाकूहल्ला करणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एकजण गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र चाकूहल्ला का केला याचे कारण अस्पष्ट असून, त्या विद्यार्थ्यांचा कारंजा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान महाविद्यालयात चाकूहल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 Comments