मोठ्या बहिणीने लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोठ्या बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात 24 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय आणि 24 वर्षीय बहिणी विमाननगर परिसरातील रो हाऊसमध्ये राहात होत्या. 18 वर्षीय तरुणी 23 जानेवारीला हॉलमध्ये झोपली असताना मोठ्या बहिणीने तिच्याशी अश्लिल चाळे केले. लहान बहिणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी तरुणी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मोठ्या बहिणीने गैरप्रकार केल्याबाबत लहान बहीण पोलीस ठाण्यात आली होती. तिने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0 Comments