किरकोळ कारणावरुन तरूणाला बेदम मारहाण

 


रोहन बाळासाहेब वाळुंज (वय 22, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळुंज हे त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी सात वाजता कामावरून घरी जात होते. डांगे चौक थेरगाव येथे त्यांच्या समांतर आरोपी दुचाकीवरून आले. दरम्यान आरोपींची दुचाकी कोलमडली. त्यावरून आरोपींनी वाळुंज यांना शिवीगाळ करून मारहाण केली.तसेच वाळुंज यांचे हेल्मेट घेऊन गाडीवर मारून गाडीचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments